ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात बल्लारपूर-चंद्रपूर शहरांचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:32+5:30
बल्लारपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. भारताच्या विविध भागातून रेल्वे बल्लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्लारपूर व चंद्रपूर येथील दोन्ही रेल्वे स्थानके रेल्वे विभागाच्या सर्वोत्तम रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात अव्वल ठरली. या दोन्ही शहरांचा समावेश या प्रकल्पात झाल्यास या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात बल्लारपूर-चंद्रपूर शहरांचा समावेश करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ड्रीम प्रोजेक्ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. या प्रकल्पात विदर्भातील केवळ अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा समावेश आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बल्लारपूर व चंद्रपूर या शहरांचा या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी ना. गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
बल्लारपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. भारताच्या विविध भागातून रेल्वे बल्लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्लारपूर व चंद्रपूर येथील दोन्ही रेल्वे स्थानके रेल्वे विभागाच्या सर्वोत्तम रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात अव्वल ठरली. या दोन्ही शहरांचा समावेश या प्रकल्पात झाल्यास या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली. प्रस्तावित प्रकल्पात बल्लारपूर व चंद्रपूर शहरांचा समावेश करू, असे आश्वासन ना. गडकरी यांनी दिले. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूरचे पदाधिकारी रामजीवन परमार, दिनेश नथवाणी, सुमेध कोत्तपल्लीवार, दिनेश बजाज, अनिल टहलियानी उपस्थित होते.