चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:53 PM2018-10-19T22:53:45+5:302018-10-19T22:54:05+5:30

चंद्रपूर प्रेस क्लबच्या संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन गुरूवारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले.

Inauguration of reference library at Chandrapur Press Club | चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर प्रेस क्लबच्या संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन गुरूवारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी समिती सदस्य तथा लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे, भाजपाचे जिल्हा महासचिव रामपाल सिंग, शहर कॉंग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर प्रेस क्लब अध्यक्ष संजय तायडे मंचावर उपस्थित होते.
पत्रकारिता प्रगल्भ व्हावी यासाठी ग्रंथालयाचे मोठे योगदान असते. पत्रकारांना विविध संदर्भासाठी ग्रंथाची गरज असते आणि म्हणून आणि म्हणून चंद्रपूर प्रेस क्लबमध्येही संदर्भ ग्रंथालय तयार व्हावे अशी इच्छा व्यक्त करीत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रंथालयासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवाय लवकरात लवकर हे ग्रंथालय सुरू करा, असे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि अवघ्या तीन- चार दिवसात या गं्रथालयाचे उदघाटनसुध्दा झाले, हा शुभसंकेत आहे. पुढेही शासन निधीतून या ग्रंथालयासाठी मोठी मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यानी दिली. याप्रसंगी नंदू नागरकर यांनी ग्रंथालयाला नगरसेवक निधीतून एक लाखांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी रामपालसिंग यांचेही येथोचित भाषण झाले. या प्रसंगी वर्तमानपत्राचे वितरक बंटी चोरडिया यांचा देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पुस्तक हे वैचारिक भुकेचे पोषण करणारे तत्व आहे. सोशल मिडियावर बातम्या पाहता येतात. पण दुसºया दिवशीच्या वर्तमानपत्राची आतुरतेने वाट बघतोच. पुस्तकही अशीच अनुभूती देते. ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांचे आंदान प्रदानही होते, असे विचार डॉ. पद्मरेखा धनकर- वानखेडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Inauguration of reference library at Chandrapur Press Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.