शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात
2
टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!
3
कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
4
"रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू
5
लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?
6
अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले
7
तुमची कामे लवकर करून घ्या, 'आपले सरकार' पोर्टल पाच दिवस राहणार बंद, कारण...
8
कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले?; मुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती
9
Stock Market Today: ग्लोबल टेन्शनदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; १२४ अंक घसरुन Sensex उघडला, IT आणि Pharma मध्ये जोरदार विक्री
10
शाहरुख-सलमानच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर काय करशील? अजय देवगण म्हणाला....
11
राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!
12
ठसकेबाज लावणी करणारी गौतमी पाटील आता महाराष्ट्राला दाखवणार पाककौशल्य, 'या' कार्यक्रमात दिसणार
13
पत्नीसोबत ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; घरबसल्या दरवर्षी मिळतील ₹१,११,०००, रक्कमही राहिल सुरक्षित
14
प्रभादेवी रेल्वे पूल लवकरच पाडणार; वाहतूक मार्गात असा होणार बदल
15
राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारे प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन
16
महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ
17
'एस्क्युज मी' बोलू नको, मराठीत बोल म्हणत मारले; डोंबिवली पश्चिमेत वाद: अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
18
महामुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना निधीचे ‘बुस्टर’; MMRDAच्या प्रकल्पांसाठी मिळणार चार लाख कोटींचे कर्ज
19
बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
20
क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी

राम सेतू पुलाला येणार झळाळी! ५ जुलैला दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण

By राजेश भोजेकर | Updated: July 3, 2023 16:10 IST

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे लोकार्पण

चंद्रपूर : चंद्रपूर येथील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळणार आहे. येत्या बुधवारी (दि. ५ जुलै) सायंकाळी ६ वाजता राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते केबलस्टे पुलावरील या दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण होणार आहे.

चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवरील पूल आता विद्युत रोषणाईने झळाळणारा देशातील तिसरा पूल असेल. देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असलेला पूल आपल्या जिल्ह्यात असणार आहे, याचा अभिमान असल्याची भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई आणि पणजीच्या (गोवा) धरतीवर हा रामसेतू उभारण्यात आला आहे. या पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई असणार आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा ही रोषनाई आकर्षित करणार आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांना कुटुंबासह जाण्यासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार असल्याची स्थानिकांची भावना आहे.

 चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या अग्रस्थानी ठेवण्याच्या दिशेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे जगातील मोठे पर्यटन केंद्र आहे. या केंद्राला जगभरातील पर्यटक भेटी देतात. आता रामसेतूवरील आकर्षण रोषणाई त्यांचेही लक्ष वेधून घेणार आहे हे विशेष.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूर