शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर परिसरात रेतीचे अवैध उत्खनन

By admin | Updated: March 10, 2016 01:23 IST

चिमूर तालुक्यातील शिवरा ते मांगलगाव रस्त्याच्या लगत मुरुम उत्खनन व नाल्यातून रेती उत्खनन करून वाहतूक करणे

ट्रॅक्टर जप्त : वाहनमालकाला पकडून कारवाई कराचिमूर : चिमूर तालुक्यातील शिवरा ते मांगलगाव रस्त्याच्या लगत मुरुम उत्खनन व नाल्यातून रेती उत्खनन करून वाहतूक करणे यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरु होते. परंतु शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विलास डांगे व त्यांचे सहकारी यांच्या जागृकतेने शिवरा परिसरात अवैध रेती, मुरुम उत्खनन करताना पकडले. तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. पळून गेलेल्या वाहनांना पकडून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास डांगे व तालुका प्रमुख धरमसींह वर्मा यांनी केली आहे.६ मार्चला रात्रीच्या सुमारास शिवरा ते मांगलगाव या रस्त्याच्या लगतच्या वनविभागाच्या जागेतून अवैधरित्या मुरुम उत्खनन तसेच नाल्यातून रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांना लागली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांना बोलाविण्यात आल्यावर रेती व मुरुम भरलेले वाहन अडविण्यात आले. तहसील प्रशासनाकडून नायब तहसीलदार राजमाने, तलाठी मडावी, तलाठी नागापूरे आले. यावेळी जेसीपी, दोन ट्रक, तीन ट्रॅक्टर होते. परंतु या वाहनांना तहसील अधिकाऱ्यांनी आर्थिक चिरीमिरी घेऊन पळवून लावून त्यांची सुटका करण्यास मदत केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. त्यानंतर ट्रॅक्टर एमएच ४० ए- ४८४२ हा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. शिवरामधील घटना असल्याने भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वनविभागाच्या जागेतून १५०० ब्रास मुरुम तर १००० ब्रास रेतीची चोरी झाली असून अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने लाखो रुपयांचा महसूल बूडविला आहे. शिवरा येथील रेती व मुरुम उत्खननाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना भ्रमणध्वनीवरुन सूचना करुनही दिरंगाई केली. जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उत्खनन वनविभागाच्या जागेत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यावरही दुर्लक्ष करण्यात आले. अवैध खनिज भरुन असलेले वाहन व त्यांच्या मालकांना पकडून फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच खनिज वाहन पळवून लावलेल्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विलास डांगे यांनी केली आहे.