शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 20, 2014 23:09 IST

बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.

चंद्रपूर : बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. शहरात प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र, या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी विळखा घातला आहे.बसस्थानकावरुन नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहत उभे राहतात. मात्र, या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होत आहे. बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवीत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे. त्यामुळे थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जाऊन गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे-मोठे अपघातही घडतात. एसटीच्या थांब्याजवळच वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. हा सर्व प्रकार ते उघड्या डोळ्याने बघतात. त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरुंद पडतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)