रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास भरावा लागेल दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:28 IST2019-09-02T00:27:45+5:302019-09-02T00:28:47+5:30

अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की, भ्रष्टाचार फोफावणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

If the ambulance is not given a road, a fine of ten thousand will have to be paid | रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास भरावा लागेल दहा हजारांचा दंड

रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास भरावा लागेल दहा हजारांचा दंड

ठळक मुद्देवाहतूक नियम कडक : वाहनधारकांना पाळावा लागणार नियम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट अधिक दंड आकारला जाणार असून रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास दहा हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. विशेषत: अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की, भ्रष्टाचार फोफावणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केला आहे. केंद्राचा हा कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे.

अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात झाल्यास पालकांना शिक्षा
पूर्वी अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास केवळ ५०० रुपये दंडाची तरतुद होती. परंतु आता नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतुद आहे. पूर्वी दारु पिऊन वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड होता, आता तो १० हजारावर गेला आहे.

ट्रिपल सिटला दोन हजारांचा दंड
ट्रिपल सिट बसवून दुचाकी चालविणाऱ्यांना आता खिशात २ हजार रुपये ठेवावे लागणार आहे. पूर्वी हा दंड केवळ शंभर रुपये होता. तसेच पूर्वी सिंग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यावर शंभर रुपये दंड होता. आता तो ५०० रुपये करण्यात आला आहे. सिटबेल्ट न बांधणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार एक हजार रुपये, विना विमा वाहन चालविणे दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

असा आहे दंड
हेल्मेट न घातल्यास हजार रुपये, सिंग्नल तोडल्यास ५०० रुपये, लायसन्स नसताना वाहन चालविल्यास, वेगाने वाहन चालविल्यास, झिकझॅक पद्धतीने वाहन चालविल्यास ५ हजार रुपये, दारु पिऊन वाहन चालविल्यास १० हजार रुपये, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जणांना बसविल्यास दोन हजार रुपये, रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास १० हजार रुपये, विमा नसताना वाहन चालविल्यास दोन हजार रुपये, वाहन चालवितना मोबाईल वापरल्यास पाच हजार रुपये, मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास २० हजार रुपये.

Web Title: If the ambulance is not given a road, a fine of ten thousand will have to be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.