लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी दि. २६ सकाळी शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात उघडकीस आली आहे.
भाग्यलक्ष्मी उर्फ बन्नू राजेश मुक्या (३४) असे मृत पत्नीचे नाव असून आरोपी पती राजेश गोपाल मुक्या (२४) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात राजेश मुक्या हा पत्नी भाग्यलक्ष्मी सोबत राहत होता. मंगळवारी तो कामावरून घरी आल्यानंतर पत्नी भाग्यलक्ष्मीने त्याच्यावर परस्त्री संबंधांचा संशय घेत वाद घातला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. आरोपीने पत्नीला मारहाण करत तिचा गळा दाबला. यातच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने ती झोपली असल्याचे समजून दुर्लक्ष केले. मात्र पहाटे उठविण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती. मित्रांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हत्येची दिली कबुली
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार गळा दाबल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय आरोपी पतीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. पोलिसांना माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर आरोपी राजेशने हत्येची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवून पती राजेश मुक्या याला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे करीत आहेत.
Web Summary : In Ballarpur, a husband murdered his wife following a quarrel over suspicions of an affair. The husband strangled her, initially thinking she was asleep. He confessed after police interrogation. He has been arrested under relevant sections of the law.
Web Summary : बल्लारपुर में, पति ने अवैध संबंध के शक में पत्नी की गला दबाकर हत्या कर दी। पति को लगा कि वह सो रही है। पुलिस पूछताछ के बाद उसने कबूल किया। उसे कानून की संबंधित धाराओं के तहत गिरफ्तार किया गया है।