युगच्या शोधात शेकडो पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:51 IST2018-08-27T22:50:44+5:302018-08-27T22:51:10+5:30
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा सहा दिवस होऊनही थांगपत्ता न लागल्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहे.

युगच्या शोधात शेकडो पोलीस तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा सहा दिवस होऊनही थांगपत्ता न लागल्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहे.
युग अशोक मेश्राम वय वर्षे २, धड न चालता येईना व बोलताही येईना, अशा अवस्थेत सहा दिवसांपासून घरासमोरील चौकातून बेपत्ता झाला. चौक वर्दळीचा असताना बेपत्ता होण्याचे क्षण कोणीही कसे काय टिपले नाही, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी शोध पत्रिका म्हणून एक पत्रक तयार केले. पोलीस यावरच अवलंबून न राहता आजूबाजूच्या ठाण्याचे अधिकारी व शेकडो पोलीस शोधपत्रिका वाटप करुन बसस्थानक, रेल्वे स्टेशन पालथे घालत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा काही दिवसात लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महिलांची विचारपूस करण्यासाठी चंद्रपूरवरुन एका महिला अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. प्रकरण रसातळाला नेल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची लहानमोठ्याच्या तोंडी युग सापडला का, अशीच चर्चा होताना दिसून येत आहे.