पुरामुळे गोवरी परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:28 AM2021-07-27T04:28:46+5:302021-07-27T04:28:46+5:30

फोटो गोवरी : राजुरा तालुक्‍यातील गोवरी परिसराला पुराचा जोरदार तडाखा बसला. यात नाल्याच्या काठावर असलेल्या शेकडो हेक्टर शेतीला मोठा ...

Hundreds of hectares of farmland in Gowri area under water due to floods | पुरामुळे गोवरी परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

पुरामुळे गोवरी परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

Next

फोटो

गोवरी : राजुरा तालुक्‍यातील गोवरी परिसराला पुराचा जोरदार तडाखा बसला. यात नाल्याच्या काठावर असलेल्या शेकडो हेक्टर शेतीला मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके पुरात वाहून गेली आहेत.

गुरुवारी राजुरा तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचे स्वरुप आले होते. बहुतांश शेती नाल्याला लागून असल्याने नाल्याचे पाणी शेतात गेल्याने कपाशी, सोयाबीन,तूर आदी पिके पुराने खरडून गेली. पावसाने काही भागात पाणी साचले आहे. अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सतत दिवसभर मुसळधार पाऊस आला. त्यामुळे नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या शेकडो हेक्टर शेतीला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर चांगलेच आर्थिक संकट ओढवले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Hundreds of hectares of farmland in Gowri area under water due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.