शेकडो नागरिकांना मिळणार घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:34 IST2018-12-05T22:33:44+5:302018-12-05T22:34:10+5:30
महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शन मिळावे, या हेतूने जोडदेऊळ सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.

शेकडो नागरिकांना मिळणार घरकुल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शन मिळावे, या हेतूने जोडदेऊळ सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.
सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे. यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. यासाठी अर्जदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पालिका कर्मचारी काम करत आहेत. वेळेचे नियोजन लक्षात घेऊन मनपाने योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. ज्यांची कागदपत्रे अपुरी आहेत अशा ४०७ अर्जधारकांना पहिल्या व आता दुसऱ्या टप्प्यात २८६ एकाच ठिकाणी बोलावून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. शासनातर्फे मंजूर योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर घोटेकर यांनी केले. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. योजनेला गती देण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत हजारो लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता बारई, विजय बोरीकर, मोरे, राजीव पिंपळशेंडे, सारिका शिरभाते, सौरभ गौतम, राहुल भोयर, नरेंद्र पवार, अतुल भसारकर, प्रतीक देवतळे तसेच संबंधित वॉर्डातील नगरसेवक उपस्थित होतें. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदानअंतर्गत ४०७ व २८६ लाभार्थ्यांच्या अजाला केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी दुसºया टप्प्यात २८६ लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया लवकरच सुरु आहे.