शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह, शाळा ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:50 IST

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतिगृह, शाळा व इतर जागा ताब्यात घेण्यासोबतच आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरूवारी कोरोना टास्क समितीच्या बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तयारी : टास्क समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतिगृह, शाळा व इतर जागा ताब्यात घेण्यासोबतच आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरूवारी कोरोना टास्क समितीच्या बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे, चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सुरपाम, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, कोविड १९ प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. निकषात बसणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, चंद्रपूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी आविष्कार खंडारे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

पुरेसा औषधसाठा व मनुष्यबळचंद्रपूर महानगर क्षेत्रासोबतच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगली नाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. अशावेळी पुरेसा औषधसाठा व मनुष्यबळाची कमरता भासू नये, यादृष्टीनेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.

अतिरिक्त प्रयोगशाळेची तयारीकोरोना तपासणीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी प्रसंगी अतिरिक्त प्रयोगशाळा उभारणे, कोरोना हॉटस्पॉट जाहीर करणे व ३५० खाटांचे महिला रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा         झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी