भगिनींच्या पवित्र धाग्याचा सन्मान राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:25 IST2018-08-26T23:24:44+5:302018-08-26T23:25:10+5:30

रक्षाबंधन हा सण बहिणभावाच्या स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करावे, ही उदात्त भावना रेशमी धाग्याशी जुळली आहे. हे नाते अधिकाधिक दृढ व्हावे व्हावे, याकरिता भगिनीच्या सुरक्षेसोबतच सन्मान राखा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. स्वत:च्या निवासस्थानी रविवारी आयोजित केलेल्या सामुहिक रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.

Honor the sacred thread of the sisters | भगिनींच्या पवित्र धाग्याचा सन्मान राखा

भगिनींच्या पवित्र धाग्याचा सन्मान राखा

ठळक मुद्देहंसराज अहीर : सामूहिक रक्षाबंधन उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रक्षाबंधन हा सण बहिणभावाच्या स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करावे, ही उदात्त भावना रेशमी धाग्याशी जुळली आहे. हे नाते अधिकाधिक दृढ व्हावे व्हावे, याकरिता भगिनीच्या सुरक्षेसोबतच सन्मान राखा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. स्वत:च्या निवासस्थानी रविवारी आयोजित केलेल्या सामुहिक रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपुत, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, शहर पोलीस निरीक्षक भगत, रामू तिवारी, विजय राऊत, खुशाल बोंडे, नगरसेवक अंकुश सावसाकडे, मोहन चैधरी, वाघुजी गेडाम आदी उपस्थित होते.
ना. अहीर म्हणाले, रक्षाबंधनाचा अर्थ मानवतेला कवेत घेणारा आहे. भावाला पवित्रा धागा बांधून बहिण आपल्या संरक्षणाची हमी मागते. राखीचा पवित्रा धागा बांधणाऱ्या भगिनी या कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षण करणाºया आहेत. तर काही भगिनी विकासाला समर्पित कार्य करणाºया आहेत. यापवित्रा सणानिमित्त प्रत्येक बांधवांना त्यांच्या कर्तव्याच्या सफलतेसाठी शुभेच्छा देत आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाप्रसंगी भगिनींच्या विकास योजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, नगरसेविका वंदना तिखे, आशा आबोजवार, अनुराधा हजारे, शितल गुरनुले, ज्योती गेडाम, सविता कांबळे, माया उईके, शिला चव्हाण, शितल कुळमेथे, आत्राम, जांभुळकर, कल्पना बगुलकर, पुष्पा उराडे, खुशबू चैधरी, चंद्रकला सोयाम, जयश्री जुमडे, छबु वैरागडे, जि.प. सदस्य वनिता आसुटकर, पठाण देशकर उपस्थित होते. याप्रसंगी ना. अहीर यांनी भगिनींना भेटवस्तु देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Honor the sacred thread of the sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.