शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच आहारात दांडी

By admin | Updated: September 10, 2014 23:29 IST

शासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार

कुपोषण कायमच : महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे ?रवी जवळे - चंद्रपूरशासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. प्रत्येक बालकाला, गरोदर व स्तनदा मातेला दररोज १२० ग्रॅम ते १४० ग्रॅम आहार घरपोच देण्याचा शासकीय नियम आहे. हा आहार दर महिन्याला शासनाकडून पुरविलाही जातो. मात्र अनेक गरोदर, स्तनदा मातांना व बालकांना घरपोच हा आहार मिळतच नसल्यामुळे महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात, तळागाळातील दुर्गम भागात हातावर आणून पानावर खात जीवन कंठत आहेत. अशावेळी आपल्या बालकांना पोषण आहार देताना त्यांना कठीण जाते. परिणामी कुपोषणाचा आलेख कधीच कमी होत नाही. त्यामुळे शासनाने कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील बालकांना, याशिवाय ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना मोफत पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केला. यावर शासन दररोज कोट्यवधीचा खर्च करते. उल्लेखनीय असे की ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर आणि स्तनदा मातांना हा आहार घरपोच देणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाला या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरात सर्वेक्षण करून ० ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची यादी तयार केली जाते. दर महिन्याला ही यादी अपडेट केली जाते. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसच्याच माध्यमातून हा आहार लाभार्थ्यांना घरपोच पोहचवावा लागतो. विशेष म्हणजे, कोणत्या लाभार्थ्याला कोणता आहार किती द्यायचा याचेही शासकीय संकेत आहेत. ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना सत्तू १३० ग्रॅम, शिरा १२० ग्रॅम व उपमा १२० ग्रॅम असा आहार दररोज द्यावा लागतो. गरोदर व स्तनदा मातांना सुकडी १४० ग्रॅम, उपमा १४० ग्रॅम व शिरा १४० ग्रॅम दररोज द्यावा लागतो. महिन्यातील २५ दिवस हा आहार दिला जातो. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या कंत्राटी कंपनीकडून महिनाभरात लाभार्थ्यांच्या निकषानुसार ८ हजार ६६ क्विंटल आहार जिल्हा परिषदेकडे पुरविलाही जातो. मात्र शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना हा आहार घरपोच मिळत नाही.