विहिरीत इसमाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:40 IST2019-06-19T00:39:23+5:302019-06-19T00:40:54+5:30
रविवारपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. विनोद रामदास बानकर रा. नेहरू वार्ड असे मृताचे आहे.

विहिरीत इसमाचा मृतदेह आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : रविवारपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. विनोद रामदास बानकर रा. नेहरू वार्ड असे मृताचे आहे.
विनोद बानकर हा कुणालाही न सांगता रविवारी सांयकाळी घरून अचानक निघून गेला. मध्यरात्री झाल्यानंतरही घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. मात्र पत्ता लागला नाही. त्यामुळे पत्नीने चिमूर ठाण्यात सोमवारी तक्रार केली. पोलीस विभाग व कुंटुंबीय शोध घेत होते. नेहरू वार्डातील पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पाण्याच्या टाकीजवळ नगर परिषदेकडून जुन्या विहिरीलाच उपसून नविन विहिरीची निर्मिती करण्यात आली. या विहिरीजवळ असलेल्या मैदानामध्ये मुले क्रिकेट खेळत असताना चेंडू विहिरीत गेला. चेंडू काढण्याकरिता विहिरीजवळ गेले असता प्रेत तरगंताना आढळले. पोलिसांना माहिती मिळताच प्रेत बाहेर काढून पंचनामा केला. मृत्युचे कारण समजले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत