चंद्रपूर : स्थानिक हाय टेक कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, रासेयो युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगा फाॅर वेल बिंग’ या संकल्पनेला समोर ठेवून ऑनलाईन आंतरराष्ट्रीय यो. दिन साजरा करण्यात आला. यो. गुरू डॉ. रवी कटलावार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. सतीश कोसलगे यांनी ‘योगा फाॅर वेल बिंग’ या संकल्पनेचा विस्तार केला. यावेळी आसन व प्राणायाम प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुशील बुरले, डॉ. पंकज पिंपळशेंडे, डॉ. वसीम शेख, प्रा. स्वाती लांडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरी योेगा केला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली होती. संचालन रासेयो समन्वयक प्रा. उमेश तेलरांधे तर आभार प्रा. पराग चवरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हाय टेक कॉलेज ऑफ फार्मसी, चंद्रपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST