युवा प्रतिष्ठानतर्फे निराधाराला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:10+5:302021-01-14T04:24:10+5:30
श्यामसुंदर शिरपूरवार हे दिव्यांग असून शहरातील तहसील मार्गावर चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यातून मिळणाऱ्या रकमेवर ...

युवा प्रतिष्ठानतर्फे निराधाराला मदतीचा हात
श्यामसुंदर शिरपूरवार हे दिव्यांग असून शहरातील तहसील मार्गावर चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यातून मिळणाऱ्या रकमेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिरपूरवार यांच्या डोक्यावर छत नसल्याने ऊन, वारा, पावसाचा फटका बसत असतो. त्यांची ही अडचण युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी हेरली. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, प्राचार्य संजय ठावरी, संजीव चांदूरकर, मिन्नाथ महाराज पेटकर, भारत चन्ने यांच्या हस्ते ८ बाय ८ चे लोखंडी दुकानाचे गाळे भेट देण्यात आले. याप्रसंगी भाऊराव कारेकार, कमलबाई शिरपूरवार, हरिदास गौरकार, अनिल रेगुंडवार, सुनील बावणे, पुसाराम डोगे, संदीप निब्रड, विजय तेलंग, अंबादास चव्हाण, प्रशांत लोडे, रमजान भाई, मधुकर हंसकार, सुधाकर दुरटकर, भारत गौरी, कवडू मडावी उपस्थित होते. संचालन उमेश पालीवाल, प्रास्ताविक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे यांनी मानले.