शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कदायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
4
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
5
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
6
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
7
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
8
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
9
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
10
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
11
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
12
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
13
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
14
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
15
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
16
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
17
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
18
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
19
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
20
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

१०० किमी प्रवास करून तो करतोय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आर्थिक उत्पन्न वाढवून देणारा मार्ग दाखविला आहे.

ठळक मुद्देबेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी : शेतीसोबतच खासगी नोकरीही सांभाळतोय

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : एकिकडे सुशिक्षित तरूण बेरोजगारी वाढली म्हणून बोलत आहेत तर दुसरीकडे कृषी क्षेत्रातील नागपूर येथील एका नावाजलेल्या ख्नासगी कंपनीत समाधानकारक पगाराची नोकरी करणाऱ्या युवकाने नागपूरपासून १०० कि.मी. अंतराचा प्रवास करीत ब्रह्मपुरी परिसरात आधुनिक पध्दतीने शेती करून हाताला काम नाही आणि शेती परवडत नाही म्हणून हताश बसलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली आहे.कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आर्थिक उत्पन्न वाढवून देणारा मार्ग दाखविला आहे.आकाश प्यारेलाल जांभूळकर असे सदर युवकाचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सालेभाटा या गावातील या युवकाने कृषी पदवीकेचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने खासगी क्षेत्रात नोकरी करणे पसंत केले. अशा परिस्थितीत या युवकाच्या मनात स्वत:चे कृषी शिक्षण व सोबतचं शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती. यातूनच या युवकाने ब्रम्हपुरी-आरमोरी रस्त्यावरील रणमोचन फाट्याजवळ दोन वर्षांपूर्वी किरायाने घेतलेल्या शेतीमध्ये धान, ऊस व ऊसामधे आंतरपीक जसे सांबार, लसण, मूग, सोयाबीन याची लागवड केली.सेंद्रीय खताचा वापरया भागातील मुख्य पीक धान असल्यामूळे, या पिकाकरिता आकाशने जमिनीची योग्य तपासणी करुन ७० टक्के सेंद्रीय खत व ३० टक्के रासायनिक खतावर भर दिला. जमिनीचा पोत सुधारण्याकरिता, पिकाची वाढ व गुणवत्ता सुधारण्याकरिता यामधे मुख्यत: कुजलेले सेंद्रीय खत व द्रवरूप टॉनिकचा पऱ्हे भरण्यापसून ते रोवणी व धानाचे लोंब भरेपर्यंत शिस्तबद्ध व काटेकोरपणे वापर केला. अशाप्रकारे एका एकरमध्ये२५ क्विंटल उत्पादन घेतले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माझ्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा व्हावा. यासाठी आपण नेहमीच शेतकºयांना मार्गदर्शन करीत राहणार आहे.-आकाश जांभूळकर, युवा शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी