जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही
By Admin | Updated: May 29, 2017 00:33 IST2017-05-29T00:33:49+5:302017-05-29T00:33:49+5:30
जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखविलेलया विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावरच आज केंद्र्रात, राज्यात, जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत भाजपाची सत्ता आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही
सुधीर मुनगंटीवार : भटाळी येथे शेतकरी शिवार संवादयात्रा
चंद्रपूर : जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखविलेलया विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावरच आज केंद्र्रात, राज्यात, जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मतदार बंधू भगिनींचे आभार माणण्यासाठी तसेच त्यांची निरंतर सेवा करण्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यासाठी शेतकरी शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून मी येथे आलो आहे. या जिल्हयाचा विकास करण्यासाठी आणि जनतेची अविरत सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजपातर्फे चंद्रपूर तालुक्यातील भटाळी येथे आयोजित शेतकरी शिवार संवादयात्रा व मतदार संपर्क अभियान कार्यक्रमात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पंतप्रधान नसून प्रधानसेवक असल्याचे म्हटले आहे. ही सेवेची भावना हा भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिलेला संस्कार आहे. हजारों शहिदांनी, वीरांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आम्हाला शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, उपेक्षित, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी दिला आहे. ज्यांच्या हातात ५० वर्षे सत्ता होती, त्यांनी सत्तेला उपभोगाचे साधन समजले. आम्ही सत्तेला सेवेचे माध्यम मानणारे आहोत, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोककल्याणकारी योजना दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याची योजना, स्टार्टअप, स्टॅन्डअप योजना, उज्ज्वला गॅस योजना, १२ रूपयांत अपघात विमा योजना, कामगारांसाठी योजना अशा विविध योजनांची मोठी मालिका जनतेला दिली. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मागेल त्याला शेततळे, विहिरींची योजना, अर्थसहाय्याची, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. पतपुरवठा, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आदीच्या माध्यमातून शेती व्यवथा बळकट करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. सिंचनाच्या योजनांसाठी पुरेसा निधी आम्ही उपलब्ध केला असून गेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी दिलेल्या निधीला कात्री लावणार नाही आणि जर लावली तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही अशी ग्वाही मी राज्यातील जनतेला दिली होती. त्यानुसार सिंचनासाठी जाहीर केलेला निधी उपलब्ध केला. सरकार आपले वाटावे अशा पध्दतीने कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.
विचोडा (बु.) येथे बंधाऱ्याचे लोकार्पण
भटाळी येथील कार्यक्रमापूर्वी चद्रपूर तालुक्यातील विचोडा (बु.) येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलपूजन करून केले. त्याचप्रमाणे या गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती ब्रीजभूषण पाझारे, नामदेव डाहुले, प्रकाश धारणे, सरपंच किरणताई डोंगरे, अनिल डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य रणजित सोयाम, किरण बांदुरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी विचोडा (बु.) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.