ग्रामस्वच्छता अभियात राज्यातून प्रथम आलेल्या राजगडला डेंग्युने घेरले
By Admin | Updated: September 9, 2014 00:17 IST2014-09-09T00:17:26+5:302014-09-09T00:17:26+5:30
ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य

ग्रामस्वच्छता अभियात राज्यातून प्रथम आलेल्या राजगडला डेंग्युने घेरले
मूल : ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र मारोड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांच्या मते राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आठ दिवसापूर्वी होती. त्यात चार रुग्ण डेंग्यूचे निघाले. त्यानंतर गावात स्वच्छता, फवारणी व आरोग्य कॅम्प लावल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
येथील आरोग्य उपकेंद्रातील सिस्टर कोसनशिले यांची भेट घेतली असता, आठ दिवसांपूर्वी गावात कॅम्प बसविल्याचे सांगितले. मात्र, रुग्णांचा आकडा देण्यास नकार दिला. याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
परिचारिकेच्या मते आठ दिवसांपूर्वी उपकेंद्रात दररोज ५० ते ६० पर्यंत रुग्ण विविध आजाराची तपासणी करण्यासाठी यायचे. मात्र आजच्या तारखेस फक्त २८ रुग्णांची नोंद आहे. ओपीडीला न येता खाजगी दवाखान्यात जात असावेत, असेही त्या म्हणाल्या. (तालुका प्रतिनिधी)