शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

25 हजार क्षेत्रात धानाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते.

ठळक मुद्देनागभीड तालुक्यातील स्थिती : पाऊस पडताच शेतकरी लागले हंगामाच्या तयारीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यात धानाच्या हंगामास लवकरच प्रारंभ होणार आहे. कृषी विभागाचे यावर्षी तालुक्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे नियोजन केले आहे.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे भरण्यास प्रारंभ केला नसला तरी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पुढील आठवड्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम सुरू करतील. तत्पूर्वी पेरणीपूर्व नागरणी, आवते व पऱ्ह्यांच्या जागेची मशागत करण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.  दरम्यान पावसाच्या या दुष्टचक्रात या तालुक्यातील शेतकरी पुरता भरडून गेला आहे. पण दुसरा कामधंदा नसल्यामुळे नाइलाजास्तव शेतीचा हा न परवडणारा उद्योग येथील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच कोरोना संसर्ग आणि लॅाकडाऊन यामुळे शेतीउपयोगी साहित्य व खते यांच्या किमतीही वाढल्या आहेत.त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

असा हवा पाऊस  

नागभीड तालुक्याची पावसाची सरासरी  १,२५६ मिमी आहे. जून महिन्यात  २१३.४ , जुलै महिन्यात ४५०.९, ऑगस्ट महिन्यात ३४४.२, सप्टेंबर महिन्यात  २०८.२ आणि ऑक्टोबर महिन्यात ३९.४ मिमी पाऊस पडायला पाहिजे. एवढा  पाऊस पडला तर धान पीक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट अशी की, असा पाऊस कधी पडतच नाही. नेहमी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. कधी आवते व पऱ्हे भरल्यांतर पावसाने हात वर केले, कधी ऐन रोवणीच्या वेळेस पावसाने डोळे वटारले तर कधी धान पीक ऐन अंतिम टप्प्यात आल्यानंतर पावसाने दगा दिला आहे. दरवर्षी शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाना सामोर जात असतो. यंदा कोरोनाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे असले तरीही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे.

तुरीचे पीक धान पिकासोबतच शेतकरी बांधावर तुरीचे पीक घेत असतात. हे पीक मोठ्या प्रमाणावर नसले तरी काही प्रमाणात प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात हे पीक घेत असतात. सध्या या बांधांवरील कचरा जाळणे, बांधांवर नवीन माती घालण्याचे काम सुरू झाले आहे. मान्सूनचे आगमण झाल्यानंतर शेतकरी तुरीची लागवड करणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी