शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अभियांत्रिकीने पेटेंट वाढविण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाचे विविध उपक्रम महाविद्यालयात कसे राबविता येतील याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. विविध विभाग आणि कार्यशाळा, वसतिगृह, ग्रंथालयाची पाहणी केली.

ठळक मुद्देराम निबुदे : विविध प्रकल्पांची विभागीय सहसंचालकांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण कमी करून झिरो ड्रॉप आउटचे लक्ष्य साध्य करावे. शिवाय त्याचबरोबर महाविद्यालयात पेटेंटस कसे वाढवता येतील, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना नागपूर विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी दिल्या. चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाचे विविध उपक्रम महाविद्यालयात कसे राबविता येतील याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. विविध विभाग आणि कार्यशाळा, वसतिगृह, ग्रंथालयाची पाहणी केली. प्राचार्य डॉ. बेडेकर यांनी महाविद्यालयातील सर्व विभागांनी मिळविलेल्या विशेष उपलब्धी, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांचा आढावा सादर केला. प्राचार्य डॉ. कुमठेकर यांनीही शैक्षणिक, प्रशासकीय बाबींची माहिती दिली. चंद्रपूर व नागपूर येथील अभियांत्रिकीद्वारे विविध कार्यक्रम कसे आयोजित करता येतील, यावर मत व्यक्त केले. संचालन प्रा. एस. आर. वाघ यांनी केले. आभार डॉ. प्रशांत वाशिमकर यांनी मानले. आयोजनासाठी प्रा. डॉ. सुरजुसे, प्रा. डॉ भूतडा, प्रा. डॉ. अकोजवार, प्रा. डॉ. इंगोले, प्रा. डॉ. राजुरकर, प्रा. पेचे, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. रझा, प्रा. डॉ खोब्रागडे, प्रा. चौधरी, प्रा निखाडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा आढावाअभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सुविधांची पुर्तता होते की नाही, याची माहिती सहसंचालक राम निबुदे यांनी घेतली. प्राध्यापक व अन्य कर्मचाºयांशी संवाद साधला.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गुणात्मक विकासासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. विविध अभ्यास शाखांचे विद्यार्थी आजच्या स्पर्धेत टिकावे. गुणवत्तेत कदापि मागे पडू नये, यासाठी लक्ष दिले जात आहे.- डॉ. पी. पी. बेडेकर, प्राचार्य