कोरपना : येथील अनेक शासकीय कार्यालय इमारतीच्या जागा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे त्या इमारतीचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, विश्राम गृह, नगर पंचायत आदी कार्यालयाचा व्याप मोठा आहे. यातील अनेक विभागांना पुरेशी जागाच नसल्याने अपुऱ्या जागेत कर्मचाऱ्यांना कामे करावी लागते आहे. सदर कार्यालये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे येथे नेहमीच रेलचेल असते. परंतु जागेअभावी येथे कामानिमित्त नागरिकांनाही दाटीवाटी सहन करावी लागते. तसेच तहसील, पोलीस कर्मचारी यांना अद्यापही निवासी सदनिका उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना किरायाच्या इमारतीत राहावे लागते आहे. परिणामी बरेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्याचा फटका नागरिकांना कामाच्या विलंबातून बसतो आहे. त्यामुळे सबंधित विभागाने याबाबत इमारत विस्तारीकरण आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.