शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

गोवरी, पवनी, सास्ती खाण परिसर प्रदुषणाच्या विळख्यात

By admin | Updated: February 7, 2015 23:21 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत या परिसरात पाच खाणी सुरू आहे. त्यातील एक खदान बंद पडली. पवनी, गोवरी, सास्ती ओपनकास्ट, सास्ती भूमिगत, गोवरी डिप या पाच खाणीमध्ये

बी.यू. बोर्डेवार - राजुरावेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत या परिसरात पाच खाणी सुरू आहे. त्यातील एक खदान बंद पडली. पवनी, गोवरी, सास्ती ओपनकास्ट, सास्ती भूमिगत, गोवरी डिप या पाच खाणीमध्ये वेकोलि कर्मचारी कार्यरत असुन सास्तीसह अन्य खाणीमध्ये तथा परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. सास्ती खुल्या खदाणीमध्ये जिकडे तिकडे धुळ पसरलेली आहे. तसेच सास्ती सीएचपीकडून येणाऱ्या ट्रकांमुळे प्रचंड प्रमाणात धुळप्रदूषण होत असल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणाहुन ट्रका जातात त्या रस्त्यावर पाणी टाकणे अत्यंत आवश्यक आहे परंतु असे होत नाही. कर्मचारी या प्रदूषणामध्येच जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.वेकोलि क्षेत्र पूर्णपणे प्रदुषणाच्या विळख्यात असताना केवळ अधिकाऱ्यांना प्रदूषण भत्ता दिला जातो. मात्र जे कर्मचारी प्रत्यक्षात प्रदुषणाच्या ठिकाणी काम करतात त्यांना मात्र या पासून वंचित रहावे लागत आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत गोवरी कॉलरी मधील ४२४ परिवार जिर्ण अवस्थेमध्ये असलेल्या वेकोलि क्वार्टरमध्ये राहतात. त्यामुळे केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर या वसाहतीतील परिस्थिती विदारक असते.निकृष्ठ बांधकाम केल्यामुळे या क्वॉर्टरचे तिनतेरा वाजले आहे. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ असस्तित्वात आहे. परंतु जेव्हा वेकोलिमध्ये प्रदुषण मंडळाचे अधिकारी येतात तेव्हा सर्व काही ठिक असल्याचे चित्र वेकोलिकडून तयार केले जाते. अधिकारी गेले की पुन्हा जैसे थे स्थिती होते. प्रदूषणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गंभीर आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. वेकोलिच्या खाणीमुळे आणि कोलवाशरीजमुळे परिसरातील शेतीवरही परिणाम पडला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. नुकसान होत असतानाही त्यांना कोणतीही मदत देण्यात येत नाही. त्यामुळे प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.