शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

खूप झाले, आता संविधान घ्या !

By admin | Updated: January 30, 2016 01:18 IST

कोणताही कार्यक्रम म्हटला की, पाहुण्यांच्या स्वागताला पुष्पहार पुष्प गुच्छ व गुलाब फुल आलेच.

शिक्षकांचा अनोखा उपक्रम : पाहुण्यांच्या स्वागतात दिली प्रतबल्लारपूर: कोणताही कार्यक्रम म्हटला की, पाहुण्यांच्या स्वागताला पुष्पहार पुष्प गुच्छ व गुलाब फुल आलेच. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची पद्धत आहे. याला अपवाद कोणतेही क्षेत्र नाही. हीच प्रथा आजतागायत सुरू आहे. तसा प्रघातच पडला आहे. मात्र याला मोडीत काढत बल्लारपूर तालुक्यातील एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी ‘खूप झाले, आता संविधान घ्या’ म्हणत पाहुण्यांचे स्वागत संविधानाची प्रत देऊन केले. शिक्षकांच्या अनोख्या उपक्रमाने प्रमुख पाहुणेही चक्रावले.औचित्य होते. बल्लारपूर तालुक्यातील तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजनाचे बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयाच्या क्रीडांगणावर १९ ते २२ जानेवारी दरम्यान शालेयस्तरावर क्रीडा महोत्सव पार पडला. उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत परंपरागत प्रथेला बाजुला सारुन भारतीय संविधानाची प्रत प्रदान करुन करण्यात आले. विशेष म्हणजे बल्लारपूर तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून संविधानाचे पुस्तक देण्यात आले. सदर उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेली येथील शिक्षिका कविता गेडाम यांच्या संकल्पनेतून तालुका कास्ट्राईब संघटनेच्यावतीने राबविण्यात आला. या तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या उपक्रमाचे मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले.भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र देशाच्या कारभार चालविण्यासाठी घटनात्मक कायद्याची आवश्यकता तत्कालीन राज्यकर्त्यांना वाटली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीत इतरही विद्वान सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यांच्या अनुषंगाने भारताचे संविधान लिहिले. संविधानात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र, समानता, एकात्मता, बंधुत्व जोपासणारे संविधान दिले.भारतीय नागरिकांना अभिप्रेत असलेल्या मुल्यांचा त्यात समावेश् करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल २ वर्ष ११ महिने व १७ दिवसांचा कालावधी लागला. तद्नंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्काीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना सादर केले होते. खऱ्या अर्थाने भारत देश २६ जानेवारी १९५० पासून घटनात्मक अधिकाराने सार्वभौम लोकशाहीचे राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जात आहे.त्यांच्या या महान कामगिरीचा गौरव म्हणून १२५ व्या जयंती उत्सवाला सोनेरी किनार लाभावी म्हणून शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल २०० रुपये किंमतीच्या संविधानाच्या पुस्तकांची भेट १२५ जणांना प्रदान करुन अनोखा पायंडा पाडला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात असा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून ‘खूप झाले, आता संविधान घ्या!’ नाविण्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. (शहर प्रतिनिधी)