गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळणार

By Admin | Updated: August 11, 2015 01:48 IST2015-08-11T01:48:35+5:302015-08-11T01:48:35+5:30

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५ हजार ६६० किमीमध्ये असलेल्या गराडी नाल्याचा

Gosikhurd project will get water from the fields | गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळणार

गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळणार

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५ हजार ६६० किमीमध्ये असलेल्या गराडी नाल्याचा जलसेतू गेल्या तीन वर्षापूर्वी क्षतीग्रस्त झाले होते. या जलसेतूची दुरूस्ती करण्यात येणार असून सावली व मूल तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीला गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. यासदंर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीत सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलसेतू उभारण्याच्या सुचना केल्या आहेत.
क्षतीग्रस्त जलसेतूच्या दुरूस्तीकडे गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागले होते. गराडी नाल्याचा जलसेतूमध्ये अंदाजे ६० लक्ष रुपये खर्च करून एक मिटर व्यासाचे ३०० मिटर लांब चार पाईप लाईन बसविण्यात येणार असून याद्वारे आसोलामेंढा तलावात पाणी सोडून त्याद्वारे सावली आणि मूल तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर शेतीचे सिंचन होणार आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी गराडी जलसेतूची तातडीने दुरूस्ती करून सावली तालुक्यात सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम आसोलामेंढा तलावापर्यंत पूर्ण झाले होते. परंतु, गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५ हजार ६६० किमीमध्ये असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गराडी नाल्याचा जलसेतूचा १०० मीटर भाग तीन वर्षापुर्वी क्षतीग्रस्त झाला. आसोलामेंढा तलावात गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सावली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून सिंचनापासून वंचित राहावे लागले.
क्षतीग्रस्त असलेल्या गराडी जलसेतूची तातडीने दुरूस्ती करून सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सिंचन विभागाकडे सतत पाठपुराव्यामुळे ६ आॅगस्ट रोजी कामाच्या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुर्वे, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता काळे, कार्यकारी अभियंता सानावणे, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे यासह अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत जलसेतून उभारण्याच्या सुचना दिल्या असून कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gosikhurd project will get water from the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.