मोनाली(आरोही)ठाकरे यांना गोल्डन विंग्ज अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:31+5:302021-04-25T04:28:31+5:30
राजुरा : पेठ वॉर्ड निवासी व ब्युटी पार्लर व मेकअप स्टुडिओच्या संचालिका मोनाली(आरोही)ठाकरे यांना ग्लॅम पेज ३ प्रोफेशनल अवॉर्ड ...

मोनाली(आरोही)ठाकरे यांना गोल्डन विंग्ज अवॉर्ड
राजुरा : पेठ वॉर्ड निवासी व ब्युटी पार्लर व मेकअप स्टुडिओच्या संचालिका मोनाली(आरोही)ठाकरे यांना ग्लॅम पेज ३ प्रोफेशनल अवॉर्ड सीझन थ्री बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
दिल्लीहून परतल्यानंतर मोनाली (आरोही) ठाकरे यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांमधून विविध विभागासाठी अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत मॉडेल डिझायनर ड्रेस, मेकअप, ज्वेलरी, रॅम्प वॉक इत्यादी प्रकार परीक्षक व अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यासमक्ष सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक उत्कर्ष निगम, दिवाश चुग, पूनम चुग होते.
मोनाली(आरोही)ठाकरे या मेकअप आर्टिस्ट विनर प्रथम आल्या.