शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आत्मरक्षणाकरिता बंदूक परवाना द्या; चंद्रपूरच्या शाहिस्ता खान पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:14 IST

भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी दिनांक २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देवून स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता तसेच आपल्या चिमुकल्या मुलीच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे.आज देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत महिला, गृहिणी,विद्यार्थिनी, नवजात मुलींपासून ते वयोवृद्ध महिला ह्या सातत्याने बलात्काराला विशेषता सामूहिक ब्लात्काराला बळी पडत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. कधी कुठली महिला या नरपिसाटांच्या विकृत मानसिकतेची बळी पडेल याचा नेम नाही. नुकतीच आंध्रप्रदेश येथील पशु वैदकीय अधिकारी प्रियंका रेड्डी या अशाच लिंगपिसाटांच्या वासनेला बळी पडलेल्या आहेत. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळण्यात आले आहे. दरोरज देशात कुठे न कुठे अशा अघोरी कृत्याला महिला बळी पड़त असल्यामुळे आज महिलांच्या जिवितेला धोखा निर्माण झाला आहे. आपण ४ वर्षाच्या लहान मुलीसोबत एकटीच राहत असून सामाजिक कार्यकर्ती असल्यामुळे रात्री - अपरात्री घरी यावे किंवा बाहेर जावे लागते त्यामुळे पिस्तूल बाळगण्याची परवानगी देण्यात यावी व यासोबतच जिल्ह्यातील महिलांना आत्मरक्षणा करिता पिस्तूल ( बंदूक) देण्यात यावी ही निवेदनातून मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिष्टमंडळात राजलक्ष्मी फुटाने, वनमाला टिकले, सीमा प्रसाद, शहाना शेख उपस्थित होत्या.

टॅग्स :Socialसामाजिक