शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:35 AM2018-01-05T00:35:17+5:302018-01-05T00:35:28+5:30

राज्य शासन अनेक योजना आखत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लाभार्थ्यांचा शोध घेणे, शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व लाभ देण्याचे निर्देश आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिले.

Give benefits to the Government of the last section of the schemes | शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या

शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या

Next
ठळक मुद्देसंजय धोटे यांचे निर्देश : चंद्रपुरात लघुगटाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासन अनेक योजना आखत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लाभार्थ्यांचा शोध घेणे, शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व लाभ देण्याचे निर्देश आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत येणाºया सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना या संदर्भातील प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक नियोजन भवनात गुरूवारी पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विकासाच्या पुढील वर्षीच्या विभागनिहाय तरतूदी, मागणी व नियोजनावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, चिमूरचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बावनकर, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाºयांनी जिल्हा वार्षिक योजनांमधील निधीतून कायमस्वरुपी पायाभूत सुविधा उभ्या राहत असतील तर त्या दीर्घकाल टिकून राहतील, असे नियोजन करण्याचे आवाहन केले. पर्यटन, क्रीडा, प्रसिध्दी या माध्यमातून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करावे, शिक्षण, आरोग्य याबाबतचे प्रस्ताव तातडीने पूर्ण करुन ग्रामीण भागातील मूलभूत गरजांना पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
यासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आढावा घेणार आहेत. त्यापूर्वी तयारी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक अधिकाºयांची उपस्थिती होती.

Web Title: Give benefits to the Government of the last section of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.