शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पंचायत समितीवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:45 IST

तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई : महिलांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.पारडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोला गावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, ही योजना पूर्णत्वास न आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाच्या दिवसात खासगी हातपंप अधिग्रहीत करुन पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, आता पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, या मागणीसाठी महिलांनी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.यावेळी संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मोर्चात नारायण हिवकर, देवराव गेडाम, सोनू राजूरकर, शीला सोयाम, अर्चना जेऊरकर, राजू कोट्टावार, रमेश तुरणकर, सुधाकर न्याहारे, प्रवीण हंसकर, सत्यवान जेऊरकर, नीलेश जेऊरकर, प्रभावती न्याहारे, वैशाली न्याहरे, मनिषा धारतकर, अर्चना कुळमेथे, करिश्मा सोयाम, अनिता टोंगे, नंदा बोरकर, माधुरी हंसकर, शोभा तुरणकर, पुष्पा राजूरकर, साधना राजूरकर आदी सहभागी झाले होते.सावलीतील फिल्टर नळ योजना बंदसावली : जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरु असलेली फिल्टर नळ योजना पुन्हा मागील पंधरा दिवसांपासून ठप्प झाली. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. ढिसाळ कारभाराचा हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. त्यात जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून फिल्टर नळ योजना आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून फिल्टर नळ योजना ही सतत बंद पडत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. मात्र, सर्वांना पाणी पुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. फिल्टर नळ योजना केवळ सहा महिने चालते. उर्वरीत सहा तांत्रिक बिघाडाने बंद असते, पाणी पुरवठा बंद असला तरी पाणीपट्टी वसुली करण्याचे काम नगरपंचायत करीत आहे. ही नळ योजना सावलीकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशा गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष घालून फिल्टरची नळयोजना पूर्ववत सुरळीत सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चा