बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देणार

By Admin | Updated: February 28, 2016 01:04 IST2016-02-28T01:04:57+5:302016-02-28T01:04:57+5:30

इतर कोणत्याही प्राणिमात्रात नाही इतकी प्रचंड कल्पकता महिलांमध्ये आहे. त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती महिला करताना दिसतात.

Get the market for the savings group item | बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देणार

बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देणार

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरात हिराई महोत्सव २०१६ चे उद्घाटन
चंद्रपूर : इतर कोणत्याही प्राणिमात्रात नाही इतकी प्रचंड कल्पकता महिलांमध्ये आहे. त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती महिला करताना दिसतात. महिलांच्या या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे महिला स्वयंसहायता गटाच्यावतीने उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, पंचायत समिती सदस्य अविनाश पाल आदी उपस्थित होते.
बांगला देशात बचत गटाची चळवळ फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. भारतातसुध्दा या चळवळीने वेग घेतला आहे. महिला या गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करीत आहे. महिलांची कल्पकता बचत गटाव्दारे निर्मित वस्तूंच्या माध्यमातून दिसून येत आहे. या महिलांच्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या समृध्द होतील, यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे, ना. मुनगंटीवार म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्गदर्शिकेचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले. संचालन सुलक्षणा गायकवाड यांनी तर आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपअभियंता कपाट यांनी मानले.
प्रदर्शनात अनेक बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला असून २ मार्च पर्यंत चालणाऱ्या हिराई महोत्सवात बचत गटाव्दारे निर्मित विविध वस्तुंचे स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
(स्थानिक प्रतिनिधी)

जिल्ह्यात मॉल उभारणार
जिल्ह्यात बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंचा चांगला मॉल उभा राहावा, असा आपला मनोदय असून त्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्यास उत्तम दजार्चा मॉल उभारु. या ठिकाणी बचत गटांना स्वस्त दरात जागा उपलब्ध करुन दिल्या जाईल. यासाठी येत्या सहा महिन्याचा भूमिपूजनाचा मुहूर्त समोर ठेवून काम करावे, असे अधिकाऱ्यांना ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी बचत गटांना राजमाता जिजाऊ पुरस्काराचे तसेच काही बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

Web Title: Get the market for the savings group item

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.