शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत हॉस्पिटल जनसेवेत लवकरच रुजू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करून दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगराच्या बायपास परिसरात उभ्या राहात असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी या दोन्हीही निर्माणाधीन वास्तूला भेट दिली. या वास्तूचे कामकाज नियोजित वेळेनुसार व्हावेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह असे हे हॉस्पिटल व्हावेत, यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी निर्माणाधीन वास्तूच्या वैशिष्टयाची माहिती घेतली. बायपास रोडवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत शंभर एकर जागेत उभी राहत आहे. सुमारे सहाशे कोटीहून अधिक निधी यासाठी मंजूर झाला असून ६४० बेडचे रूग्णालयसुद्धा याठिकाणी उभे राहणार आहे. तर याच परिसरात राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूरआणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्त्वावर शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या निर्माण संदर्भात काम करणाºया विविध एजन्सीच्या अधिकारी व समन्वयकांसोबत चर्चा केली.या भागातील जनतेला उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी लवकरात लवकर या भव्य वास्तूमधून आरोग्यसुविधा सुरू व्हाव्यात. यासाठी सगळ्यांनी जागरूकपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारhospitalहॉस्पिटल