गेल्या काही वर्षात शहराच्या भोवती अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यात समता कॉलनी, वसुंधरा नगर, लक्ष्मी नगर, पटवारी ले - आऊट, सम्राट अशोक नगर, प्रगती नगर, विद्या नगर, आदर्श कॉलनी, मुसाभाई नगर, लालाजी नगर, फ्रेंडस कॉलनी, सुंदर नगरी, सिद्धी विनायक कॉलनी, अशा अनेक वसाहतींचा यात समावेश आहे. अनेक वसाहती निर्माण होत आहेत. काही वसाहती निर्माणाधिन आहेत.
याशिवाय नागभीड शहर नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हा स्थळांना मध्यवर्ती असल्याने अनेक चाकरनामे नागभीडला आता पसंती द्यायला लागले असून या वासाहतीमधील भूखंडांची विक्रीही जलदगतीने होत आहेत. अनेक टोलेजंग इमारती व बंगले या वसाहतींमध्ये उभे होत असले आणि लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या वसाहतीमध्ये अद्यापही बगिच्याची निर्मिती करण्यात आली नाही, हे विशेष. गेल्या काही वर्षात निवृत्त होणाºयांची संख्या वाढत असल्याने शहरात जेष्ठ नागरिकांची भर पडत आहे. या जेष्ठ नागरिकांना वेळ कुठे आणि कसा घालवावा, असा प्रश्न भेडसावत आहे. शहरात एखाद्या बगिच्याची निर्मिती झाल्यास जेष्ठ नागरिकांसमोर निर्माण होत असलेल्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते. याच बगिच्यात व्यायामाची साधने उपलब्ध करून दिल्यास मुले व तरूणांनाही दिलासा मिळू शकतो
वसाहतीच्या नियमानुसार प्रत्येक वसाहतीत ''''ओपन प्लेस'''' म्हणून मोकळे भूखंड ठेवण्यात आले आहेत. शहरात अशा मोकळ्या भूखंडांची संख्या २० च्या आसपास असल्याची माहिती आहे. यातील काही मोठया भूखंडावर बगिच्याची निर्मिती करण्यात आल्यास ते सर्वांना सोयीचे ठरू शकते. नागभीड नगर परिषदेने गेल्या तीन चार वर्षात ३८ कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते व बाजाराच्या विकासासाठी व इतर अनेक कामासाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे. असाच बगिच्याच्या निर्मितीसाठी निधीसाठी शासनाकडे साकडे घालावेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.