शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ७६ कोटींचा निधी अडकला; पाणीपुरवठा योजनांवर गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:31 IST

Chandrapur : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला मिळणारा ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला मिळणारा ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. निधी मिळण्यात झालेल्या विलंबामुळे काही कामे रखडली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीटंचाईचा धोका वाढला आहे.

जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के आर्थिक सहभाग दिला जातो. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून ५७ कोटी २३ लाख रुपये, तर राज्य सरकारकडून १८ कोटी ८० लाख रुपये असा एकूण ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अनेक गावांतील सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे आर्थिक अडचणीमुळे अर्धवट अवस्थेत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. ग्रामीण भागात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

अशा परिस्थितीत निधीअभावी कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही या परिस्थितीची गंभीर दखल घेतली. प्रलंबित निधी तत्काळ मिळावा, यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला असून, संबंधित गावांत पर्यायी उपाययोजनाही केल्या आहेत.

"निधीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरूच आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचणच भासू नये, यादृष्टीने विविध प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या."- सुमित बेलपत्रे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Funds আটকে, Water Supply Schemes Face Setback

Web Summary : Chandrapur's जलजीवन Mission faces setbacks as ₹76 crore in funds are delayed, hindering water supply projects. This threatens water scarcity in rural areas during the summer. Despite the delay, efforts are underway to mitigate potential water shortages.
टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र