शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. या महाविद्यालयाचे काम दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १८ जून २०१९ रोजी विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन नक्षलप्रभावित जिल्हयांमध्ये तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी तीन वर्षात ५०० कोटींचा आराखडा तयार करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी १७५ कोटी रू. निधी या तीन जिल्ह्यासाठी आवंटीत करण्याची घोषणासुध्दा करण्यात आली होती. सदर योजना पुढे नेत या वर्षी यासाठी १७५ कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर हे तीन जिल्हे देशातल्या ९० नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी आहे. हे तिनही जिल्हे वनक्षेत्र बहुल, आदिवासीबहुल व मागास आहे. या जिल्हयांमधील जवळपास सर्वच तालुक्यांचा समावेश मानव विकास निर्देशांकामध्ये आहे. या तीन जिल्हयांसाठी सुक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग यांना चालना देत तरूणांच्या हाताला काम मिळावे व नक्षलवाद संपविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया हे जिल्हे रोजगारयुक्त व्हावे यासाठी ही योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. ही योजना पुढे नेण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी द्यावेचंद्रपूर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. या महाविद्यालयाचे काम दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.सैनिकी शाळेसाठी हवे ७६ कोटीचंद्रपूर जिल्हयातील सैनिक शाळा ही देशाचा गौरव वाढविणारी एक महत्त्वाची अशी वास्तु आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणारे शुरवीर घडविण्याचे कार्य या शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहे. या शाळेसाठी आवश्यक निधी मागील दोन वर्षामध्ये शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर्षीच्या फेब्रुवारीमधील पुरवणी मागण्याद्वारे सदर सैनिकी शाळेसाठी ७६ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार