वनविकास महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करू-मुनगंटीवार
By Admin | Updated: February 29, 2016 00:40 IST2016-02-29T00:40:05+5:302016-02-29T00:40:05+5:30
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे न्यायोचित प्रश्न, न्यायोचित मागण्यांची पूर्तता करण्यात येईल.

वनविकास महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करू-मुनगंटीवार
चंद्रपूर : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे न्यायोचित प्रश्न, न्यायोचित मागण्यांची पूर्तता करण्यात येईल. वनविकास महामंडळाच्या माध्यमातून वनविकास साधण्यासाठी आपण सर्वजण जे परिश्रम घेत आहात, ते निश्चितच अभिनंदनीय आहेत. राज्य सरकार वनविकास महामंडळाच्या कर्मचारी बांधवांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली .
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष एम ए पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अधिवेशनाला राज्यभरातील वनविकास महामंडळाचे कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)