शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:39 PM

मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

ठळक मुद्देमहालगाव परिसरात दहशतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत शेगाव उपवनक्षेत्रातील महालगावात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने दिवसा व रात्री धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. बिबट्याने मागील चार दिवसात विधवाज देवराव महातळे, दत्तु आनंद उरकुडे, संतोष मारोती तुराळे, दिवाकर बदखल, सुर्यभान फरचाके यांची जनावरे ठार केली आहेत. दरम्यान, बुधवारी सुर्यभान परचाके यांच्या घरातील अंगणात बांधून असलेल्या बकरीवरही हल्ला करून ठार केले. बकरीच्या ओरडण्यामुळे नागरिक घटनास्थळी धावून आले असता त्यांना बिबट दिसला. त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. दहशतीमुळे शेतातील कामावर विपरित परिणाम झाला आहे. सदर बिबट महालगाव परिसरातील अनेक गावात जात असल्याने नागरिक रात्री घराबाहेर पडायला घाबरत आहे. याबाबत नागरिकांनी वरोरा व शेगाव वनविभागाकडे तक्रार नोंदविली असून वन कर्मचारी नागरिकांना सोबत घेऊन गस्त घालत आहे. डोळ्यात तेल घालून जनावरांवर शेतकरी पाळत ठेवत आहे. वनविभागाने कॅमेरे लावून बिबट्याचा शोध घेणे सुरू केले आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या