लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शहरातील विविध समस्या सोडविण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष बादल बेले यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली. दरम्यान ना. अहीर यांनी राजुºयातील समस्या युध्दपातळीवर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच संबंधित विभागांना सुचना करून यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही दिले.राजुरा शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुभाजकांची उंची वाढवून रिफ्लेक्टर लावावे, बंद स्थितीतील तालुका क्रीडा संकुल त्वरित सुरू करावे, इंदिरा नगर वॉर्ड येथे हनुमान देवस्थानात बोअरवेल द्यावी, पंचायत समिती चौकात वाहतूक सिग्नल चालू करावे, शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करणे, पोलीस कार्यालय व पोलीस कर्मचाºयांच्या वसाहतीचे व पोलीस कार्यालयाचे नुतनीकरण करावे, महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीकरिता आदर्श माल बनविणे, राजुरा पशु वैद्यकीय रुग्णालय इमारतीचे नुतनिकरण करणे, महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या राजुरा आगाराच्या शेड्युल क्रमांक ८५ आर राजुरा-नागपूर-राजुरा बस पुर्ववत चालू करावे, आदी समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
राजुऱ्यातील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:24 IST
शहरातील विविध समस्या सोडविण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष बादल बेले यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली. दरम्यान ना. अहीर यांनी राजुºयातील समस्या युध्दपातळीवर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
राजुऱ्यातील समस्या सोडवा
ठळक मुद्देभाजपा कमिटी : गृहराज्यमंत्र्यांना निवेदन