Fish endangered by water pollution in Ramala Lake | रामाळा तलावातील जलप्रदूषणाने मासे धोक्यात

रामाळा तलावातील जलप्रदूषणाने मासे धोक्यात

ठळक मुद्देशहरातील सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र ठरू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडकालीन रामाळा तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याामुळे दररोज शेकडो मासे मरत आहेत. त्यामुळे तलाव प्रदुषणमुक्तीसाठी तलावाचे खोलीकरण करण्याची गरज आहे. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारपासून इको-प्रो अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.
शहराच्या मधोमध असलेल्या रामाळा तलावामुळे परिसरात भूजल पातळी कायम राखली जाते. मात्र याच तलावातच मच्छिनाल्यातील संपूर्ण सांडपाणी शिरते. तलावातील प्रदूषित पाणीमुळे जमिनीत मुरत असल्याने भूजल दूषित झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणामुळे शहरातील पाच तलाव नष्ट झाले. तुकूम तलाव, बाबूपेठचा गौरी तलाव, 'घुटकाळा तलाव, लेंडारा तलाव आणि लालपेठ मातानगर ला लागून असलेला लाल तलाव इतिहास जमा झाली आहेत. शहराच्या मधोमध असलेला एकमात्र ५०० वर्षांपूर्वी गोंडराजांनी बांधकाम रामाळा तलाव शेवटची घटका मोजत आहे.
मच्छी नाल्याचा प्रवाह अन्यत्र वळता करावा, रामाळा तलाव प्रदुषणमुक्त व सौंदर्यीकरण करून पर्यटन विकास करणे. तलावाच्या दक्षिण दिशेकडील वडाच्या झाडापासून उदयानात जाण्यास प्रस्तावित पुलाचे बांधकाम करावे, रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे. तलावात येणारा मच्छी नाल्याचा प्रवाह अन्यत्र वळता करावा, वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट बसवावे. 
तलावाच्या दोन्ही बाजुला असलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही अशी व्यवस्था करावी, परिसरातील अतिक्रमणाची समस्या दूर करण्यासाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

Web Title: Fish endangered by water pollution in Ramala Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.