हंसराज अहीर : योजनांची अंमलबजावणी जलदगतीने करा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : खासदार आदर्शग्राम चंदनखेडा विकासाची आदर्श प्रतिकृती व्हावी, यासाठी तालुका प्रशासनातील योजनांची अंमलबजावणी जलदगतीने करावी, याबाबतचे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. चंदनखेडा येथील ग्रामपंचायत भवनात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात नाविन्यपूर्ण व सौरउर्जेवर आधारित एकमेव ग्रामपंचायत म्हणून चंदनखेडा ग्रामपंचायतीने नावलौकिक केल्याबद्दल ना. हंसराज अहीर यांनी सरपंच गायत्री बागेसर, उपसरपंच हनवते यांचा शाला श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ना.हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना विकास कामे थांबल्याच्या तक्रारीची आल्याने त्याची विचारणा केली. व संबंधित कंत्राटदारास सदर कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची ताकीद दिली. अन्यथा संबंधितांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. तसेच चंदनखेड्यातील विकास कामाचा आढावा दर महिन्यात घेवून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. यावेळी जि.प.सदस्य मारोती गायकवाड, पं.स. सभापती विद्या कांबळे, टोंगे, सोनकुसरे, डेविस बागेसर, विठ्ठल कापकर, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, उपविभागीय अधिकारी भुसारी तहसिलदार कुमावत, संवर्ग विकास अधिकारी तुपे, पाटोळे, ठावरी, सुमित मुडेवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौर ऊर्जेवरील उपकरणाचे लोकार्पण आदर्श ग्राम चंदनखेडा आढावा बैठकीत ना. हंसराज अहीर यांनी सौरउर्जेवर आधारीत पॉवर बॅकेच्या कंपोस्ट खत निर्मिती यंत्राचे, तसेच वॉटर ए.टी.एम. मशीनचे लोकर्पण केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. यादरम्यान सिंचन बंधाऱ्यांची कामे, इमारतीची कामे व प्रस्तावित कामे समयबध्द कालावधीच पूर्ण होण्यासाठी या गावास प्रमुख अधिकाऱ्यांनी विशेष नियंत्रण ठेवण्याच्या सूचना केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या.
चंदनखेडा सौरऊर्जेवरील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
By admin | Updated: May 24, 2017 02:18 IST