शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसूचनांतून आकारास आलेला पहिला अर्थसंकल्प

By admin | Updated: April 11, 2016 00:57 IST

लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य या संकल्पनेवर राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकांच्या सूचनांवर आधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवार : अर्थसंकल्पाचे अचूक व काटेकोर विश्लेषणचंद्रपूर : लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य या संकल्पनेवर राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकांच्या सूचनांवर आधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आला. त्यामुळेच सर्व घटकांना समान न्याय हे या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प आकारास आला आहे. काटकसर म्हणजेच उत्पन्न या सूत्राने अर्थव्यवस्था सशक्त व मजबूत करण्याचा संकल्प करु या, अशा अचुक शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी ज्ञानज्योती विचार मंचातर्फे आयोजित अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमात ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे अध्यक्षस्थानी होते. महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, रवी भागवत व सपना मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. अतिशय सोप्या व सुरेख भाषेत ना. मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. पैशाची काटकसर करणे हे उत्तम अर्थमंत्र्यांचे कर्तव्य असते, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. राज्याचा अनुत्पादक खर्च वाढत होता, महसुली तूट वाढत होती. तरीही ३२२ दिवसात राज्याचा विकास दर ५.८ वरुन ८ टक्के इतका झाला. म्हणजे २.२ टक्क्यांची वाढ झाली. अर्थसंकल्प जनतेचा असावा, यासाठी लोकांच्या सुचना मागविल्या होत्या. नागरिकांनी अतिशय उपयुक्त अशा तीन हजारावर सुचना केल्या. त्यातील काही सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. लोकसूचनांचा समावेश असलेला देशातील हा पहिला अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या सर्वाधिक म्हणजे ५० टक्के संधी कृषी क्षेत्रात आहेत. ज्या देशात शेती जास्त असेल, तोच देश २०३० मध्ये जगात श्रीमंत असणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. वास्तविक ही तरतूद २६ हजार ९८१ कोटींची आहे. २०१२-१३ मध्ये ही तरतूद १५ हजार कोटींची होती. आता ती २६ हजार ९८१ कोटी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे निसर्ग संपन्नता आहे. पावसाचा थेंब न थेंब वाचविल्यास आपला देश जगाचा पोशिंदा बनेल असे ते म्हणाले.महिलांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असल्याचे ते म्हणाले. राज्य महामार्गावर दर शंभर किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येतील. त्यांचा दर्जा उत्तम ठेवण्यात येणार आहे. पाहिल्या टप्प्यात शंभर स्वच्छतागृह बांधले जातील. महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरु केली जाईल. मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समिती गठीत केली जाईल. स्वत: च्या घरादाराची पर्वा न करता आपल्यासाठी ज्यांनी देशाची सेवा केली, त्या स्वातंत्रसंग्राम सैनिकांना हक्काच घर मिळावे, यासाठी योजना केली व यात त्यांना १० लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. येणाऱ्या चार वर्षात कृषी रस्ते, पांदण रस्ते करण्याचा निर्णय केला.१ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा जागतिक विक्रम आपण करणार आहोत. या उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन वृक्ष लावावेत व ते जगवावेत, असे आवाहन त्यांनी केले. आदर्श अंगणवाडी योजनेत १० हजार अंगणवाडया आदर्श करण्यात येणार आहेत. यासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)