चंद्रपुरातील शासकीय मेडिकल महाविद्यालयाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:34+5:30

चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे बांधकाम कामगारांसाठी तात्पुरती वसाहत तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करताना गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण करून जवळच्या इमारतीपर्यंत पोहोचली. हे दृश्य बघून परिसरातील नागरिकांनी ही माहिती कंट्रोल रूमला दिली. काही वेळातच मनपाचे अग्निशमन पथक दाखल झाले.

Fire at Government Medical College in Chandrapur | चंद्रपुरातील शासकीय मेडिकल महाविद्यालयाला भीषण आग

चंद्रपुरातील शासकीय मेडिकल महाविद्यालयाला भीषण आग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पागलबाबा नगर येथील मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधीन इमारतीमधील बांधकाम मजुरांच्या वसाहतीमधील सिलिंडर गळतीने आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठी धावपळ उडाली होती. मनपाच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व पाच पाण्याचे टँकर घटनास्थळावर पोहोचले. रात्री ९.३० पर्यंत आग आटोक्यात आली होती.
 चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे बांधकाम कामगारांसाठी तात्पुरती वसाहत तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करताना गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण करून जवळच्या इमारतीपर्यंत पोहोचली. हे दृश्य बघून परिसरातील नागरिकांनी ही माहिती कंट्रोल रूमला दिली. काही वेळातच मनपाचे अग्निशमन पथक दाखल झाले. अग्निशमन पथकाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आठ सिलिंडरचा स्फोट झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, नेमक्या किती सिलिंडरचा स्फोट झाले हे कळू शकले नाही, या घटनेत जीवितहानी झाली नाही. रात्री ९.३० वाजता आग आटोक्यात आल्याची माहिती उपमहापौर राहुल पावडे व रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मधुकर गीते यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

Web Title: Fire at Government Medical College in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.