डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या मुलाला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:00+5:302021-09-17T04:34:00+5:30

मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ही बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय ...

Financial assistance to a child undergoing head surgery | डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या मुलाला आर्थिक मदत

डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या मुलाला आर्थिक मदत

मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ही बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना कळताच त्यांनी त्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी हातभार लागावा म्हणून आपल्याकडून आर्थिक मदत पाठवली.

ही मदत देताना ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, जि.प. सदस्य स्मिता पारधी, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट, उदापूर येथील सरपंच प्रभाकर ऊर्फ सोनू नाकतोडे, शामराव राऊत, प्रवीण राऊत, देवराव भोयर, देवराम राऊत, लक्ष्मण कोरणकार, देवराम ठाकरे, कुशाबराव शेंडे, राजू राऊत, महादेव प्रधान, हेमंत राऊत, श्रीधर राऊत, गंगाधर ठाकरे, बाळकृष्ण मिसार, उत्तम राऊत, देवराम बुराडे यांची यावेळी उपस्थिती होती.

160921\img-20210915-wa0145.jpg

आर्थिक मदत देताना पदाधिकारी

Web Title: Financial assistance to a child undergoing head surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.