शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त कुलगुरूंचा मनोवेधकडून सत्कार

By admin | Updated: October 25, 2014 01:12 IST

गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित आणि कोळसा- पोलाद संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ..

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित आणि कोळसा- पोलाद संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार हंसराज अहीर यांचा मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बदखल उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दीक्षित म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन आपण कार्य करण्याचा प्रयत्न करू. आपल्या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल त्यांनी राज्यपालांचे आणि माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे आभार मानले. खासदार हंसराज अहीर म्हणाले, संसदेत काम करताना आपणास बऱ्याच गोष्टींचा जवळून अभ्यास करायला मिळाला. आपण जबाबदारीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. केंद्र सरकारने कोळसा- पोलाद संसदीय समितीचे अध्यक्षपद देऊन आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ, असे ते म्हणाले.शांताराम पोटदुखे यांनी दोन्ही सत्कारमूर्तींचा भाषणातून गौरव केला. चंद्रपूरचे भूषण असलेली ही दोन्ही माणसे मोठ्या पदावर पोहचली, याचा आपणास आनंद असल्याचे ते म्हणाले. विजय बदखल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनोवेधचे सचिव प्रशांत आर्वे यांनी, तर आभार मनोज साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सहकुटूंब उपस्थित होते. ( प्रतिनिधी)