चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; दोन जागीच ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:16 IST2019-05-16T12:06:50+5:302019-05-16T12:16:57+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यात गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; दोन जागीच ठार, दोन गंभीर
ठळक मुद्देटायर फुटल्याने गाडी झाली अनियंत्रित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुक्यात गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गांगलवाडी ते गुडगाव या मार्गावरून जात असलेल्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटल्याने गाडी अनियंत्रित झाली. ही गाडी पाचवेळा हवेत फिरून जमिनीवर आदळली. यात गोसेखुर्द प्रकल्पावर काम करणारे ओ एस एस कंपनीचे सुमारे ७-८ कर्मचारी जात होते. या भीषण अपघातात दोघेजण घटनास्थळीच ठार झाले तर बाकीचे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.