शेती खर्च वाढला, मात्र उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:33 AM2019-06-02T00:33:50+5:302019-06-02T00:34:11+5:30

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

Farming costs increased, but the yield declined | शेती खर्च वाढला, मात्र उत्पन्न घटले

शेती खर्च वाढला, मात्र उत्पन्न घटले

Next
ठळक मुद्देखतांच्या किंमती अवाक्याबाहेर। मोफत पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.
केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे खत कंपन्याकडून खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रुपये भाववाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत. दरवर्षी शेतकरी उन्हाळ्याच्या शेवटी खतांची निवड करुन त्याची खरेदी करतात. मात्र, यावर्षी खतांची भाववाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही.
अशी आहे मागणी
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकºयांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी खतांशिवाय पर्याय नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

Web Title: Farming costs increased, but the yield declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती