शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे.  ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी  २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत.

ठळक मुद्देबोगस बियाण्यांचाही धोका : कास्तकारांपुढे अनंत अडचणी

वसंत खेडेकरलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बियाण्यांच्या किमती दरवर्षी वाढत जात आहेत. यंदाही त्या बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत. वाढलेला हा खर्च कसा पेलायचा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या सोबतच बोगस बियाणे हा संभाव्य धोकाही  त्यांना अस्वस्थ करतो आहे.यंदा पाऊस दमदार बरसणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्याचप्रमाणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे.  ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी  २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत. त्याप्रमाणे सर्व बियाण्यांचे भाव ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. कितीही किंमत वाढली तरी बियाणे खरेदी करणे आहेच. दुसरा पर्याय नाही. कसेही करून बियाणे घेतले तरी दुसरा एक धोका कास्तकारांना पुढे बोगस बियाण्यांचा असतो. खर्च करून बियाणे विकत घेतले आणि कष्ट करूनही ते उगवले नाही. उगवले तरी त्यावर फुल-फळ उगवले नाही तर वर्षभराची मेहनत वाया जाते. सारे नियोजन कोलमडून जाते. असा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. तरीही मोठ्या आशेने कास्तकार पेरणी करीत आहेत.

गतवर्षी बियाणे उगवले; मात्र फळधारणा नाहीयेथील प्रगतशील कास्तकार राजू शर्मा यांनी गतवर्षी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. झाड उगवले पण फळ जेमतेमच आले. निराशा होऊन त्यांनी त्यावरून ट्रॅक्टर चालविला. असे अनेक ठिकाणी घडले आहे. बोगस बियाणाबाबत कास्तकारांकडून  कृषी विभागाकडे तक्रारी केल्या जातात. मात्र पुढे त्यांचे काहीच होत नाही. असे याबाबत सात शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्याकडून कास्तकार नागविले जात राहतील. कास्तकारांना निसर्ग आपत्तीला तोंड द्यावे लागतेच. सोबतच अशा प्रवृत्तीच्या लोकांपुढे त्यांचे अतोनात नुकसान होते.  

बोगस बियाणे कसे ओळखायचे?खरेदी करून आणलेल्या बियाणांच्या पिशवीतून मूठभर दाणे पाण्यात भिजवून ओल्या कपड्यात हवेशीर जागेत तीन दिवस ठेवायचे. चवथ्या दिवशी त्या सर्वांमधून अंकुर फुटले तर ते पेरणीयोग्य समजावे. कृषी विभागाकडूनही ही पद्धत सांगितली जाते. प्रचलित दुसरी पद्धत अशी म्हणजे बादलीतील पाण्यात बियाणे टाकायचे. थोड्या वेळाने जे तळाशी बसतील, ते योग्य, वर तरंगणारे अयोग्य. या दोन्ही पद्धती वेळ जात असला तरी त्यामुळे धोका टाळता येतो.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती