शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:40 IST

जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांमध्ये नाराजी। प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित आहेत. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून कुटुंबीयांनी केली आहे.जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु शेतकरी आत्महत्यांची संख्या अजुनही घटली नाही. जिल्ह्यात २००३ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली होती. २००४ वर्षात जिल्ह्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पण, यातील पाच प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. २००५ रोजी ही संख्या १७ झाली. २००६ या वर्षात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २४ कुटुंबांनाच सरकारकडून मदत मिळाली. २०१४ पासून २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने व्यक्तीगत व सामूहिक लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या. परंतु, ग्रामीण भागात योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कृषी धोरणाच्या अंमलबजावणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे २०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकरी आत्महत्या केल्या. ५२ पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी ११ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे असहकार्य२०१८ मध्ये ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ३५ प्रकरणात शासनाकडून मदत मिळाली. १३ प्रकरणे अपात्र ठरली. जानेवारी ते फेबु्रवारी २०१९ दरम्यान सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या. परंतु, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. खरीप हंगामाला सुरूवात झाली. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकार्य मिळत नाही. हाच प्रकार सुरू राहिल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या