Farmers should use BBF technology | शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा

ठळक मुद्देकुणाल खेमनार । खरिपात जादा उत्पादन घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बीबीएफ तंत्राचा पेरणीसाठी अवलंब केल्यास जास्त पाऊस व पावसाचा खंड या दोन्ही परिस्थितीत पिकाची वाढ चांगली होते. त्यामुळे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी रूंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास उडीद, मूग, कापूस, ज्वारी आदी आंतरपिके शेतकरी त्याच्या शेतात घेऊ शकतो आंतरपीक घेतल्याने अतिरिक्त उत्पन्न शेतकºयास मिळण्यास मदत होते. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पिकाला जलसंधारण होण्यास मदत मिळते तसेच सरीत पडलेल्या पावसाचे पाणी चांगले मुरते. अधिक पाऊस पडला तर सरीद्वारे पाण्याचा निचरा होतो. पावसाच्या खंड काळात पीक पाण्याचा ताण सहन करते व पिकाची चांगली व जोमदार वाढ होण्यास मदत मिळते, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे पेरणी केल्यास एकरी १६ किलो बियाणे पेरणीसाठी लागत असते. शेतकºयांना प्रती हेक्टर २५ ते ३० किलो बियाणे कमी लागते. त्यामुळे एकरी खर्च कमी येत असतो. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे ६५ ते ७५ किलो प्रति हेक्टर बियाणे जमिनीची पोत आणि वाणानुसार आवश्यक असते. जास्त पाऊस झाला अथवा सतत पाऊस झाल्यामुळे वा शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांची वाढ खुंटते त्यामुळे उत्पादनात घट येते. परंतु बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी केल्यास सरीद्वारे पाण्याचा निचरा होतो. शेतकºयांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधून बीबीएफ तंत्रज्ञानाचा खरीप वापर करावा, असे आवाहन केले आहे.

उत्पादनाचा खर्च निम्म्यावर
शेतकºयांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सोयाबीन पिकाच्या उत्पादनाचा खर्च निम्म्यावर येतो. उत्पन्नात २ ते ३ क्विंटल पर्यंत वाढ होण्यास मदत होते. जास्त पाऊस अथवा कमी पाऊस झाल्यास या तंत्रज्ञानामुळे शेतकरी पिकाचे नुकसान टाळतो. रुंद वरंबा सरीमुळे झाडाच्या मुळाला हवा खेळती राहत असल्याने तथा झाडाची संख्या कमी राहत असल्याने झाडांची वाढ चांगली होऊन पीक जोमदार येण्यास मदत होते. यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. चित्रफितीच्या माध्यमातून या तंत्राची माहिती शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या सूचना कृषी अधिकाºयांना दिल्या.

Web Title: Farmers should use BBF technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.