शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांसाठी शेतकऱ्यांची सर्वत्र शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:18 IST

शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.

ठळक मुद्देशेजारच्या जिल्ह्यातून मजूर बोलावले धान कापणी व कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे कामासाठी या भागातील मजूरवर्ग इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या धान कापणी व कापूस वेचणीची कामे केली जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.गोंडपिपरी तालुक्यात धान पिकाचे सर्वाधिक उत्पादक घेतले जाते. मात्र तालुक्यात सिंचनाची सुविधा फारशी नसल्याने अनेकांनी यंदा धानासोबत कापसाचे पीक घेतले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ठाकले होते. त्यानंतर बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धान, कापसाचे पीक घेतले. मोठ्या कष्टाने हे पीक जगविले. आता धान कापणीच्या अवस्थेत आहे. कापूस काढणीचा हंगाम आहे. शेतशिवार पांढरे शुभ्र दिसत आहे.आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कापूस शेतात फूटलेला आहे. धानासह कापूस वेचण्याचा हंगाम एकत्र आल्याने मजुरांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या शोधात परिसरात भटकंती करीत आहे. पाच ते सहा रुपये प्रती किलो कापूस वेचणीचा दर आहे. जादा पैसे आणि जाण्या-येण्याच्या खर्चाचे आमिष दाखवूनही मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक जण इतर जिल्ह्यातून मजुरांना आणून कापूस वेचणीची कामे करीत आहेत.उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यतायावर्षीच्या अत्यल्प पावसाने व विविध रोगामुळे धान व कापूस उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत. पिकाला मिळत असलेल्या अल्पशा भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धान कापणी व कापूस वेचणीला लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. धान रोवणीपासून ते कापूस काढण्याच्या मशागतीला लागणारा खर्च वजा करता शेती न परवडण्यासारखी झाली आहे. मजुरांच्या अभावामुळे धानाचे पुंजणे आणि कापसाचे बोंडही शेतकऱ्यांच्या घरात अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी