शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
3
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
4
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
7
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
8
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
9
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
10
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
11
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
12
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
13
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
14
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
16
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
17
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
18
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी किडनी विक्री प्रकरण : वैद्यकीय तपासणी करणारे भारतातील दोन डॉक्टर 'एलसीबी'च्या 'रडार'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:39 IST

Chandrapur : क्रिष्णा, हिमांशू भारद्वाजसह आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किडनी विक्रीसाठी कंबोडिया येथे पाठवण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करणाऱ्या भारतातील दोन डॉक्टरांची ओळख 'एलसीबी'च्या पथकाला पटली आहे. एक डॉक्टर दिल्ली व एक तामिळनाडू येथील असून, 'एलसीबी'चे पथक 'रडार'वर असल्याची माहिती आहे. दरम्यान, रामकृष्ण व हिमांशू भारद्वाज यांना सोमवारी (दि. २९) न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपी असलेले सहा अवैध सावकारही न्यायालयीन कोठडीत आहे.

रामकृष्ण व हिमांशू हे दोघे गरजूंना हेरून किडनी विक्रीसाठी बाध्य करायचे. त्यानंतर त्यांना कोलकत्ता येथील पॅथॉलॉजीमध्ये नेऊन रक्त तपासणी, वैद्यकीय तपासणी करायचे. ही तपासणी कोणते डॉक्टर करत होते. या अनुषंगाने पोलिसांचे पथक तपासात गुंतले होते. रामकृष्ण व हिमांशू हे पोलिस कोठडीत असताना त्यांनी या दोन्ही डॉक्टरांची नावे पोलिसांना सांगितली. तेव्हापासून एलसीबीचे पथक या डॉक्टरांच्या शोधात रवाना झाले आहेत. हे डॉक्टर सापडल्यानंतर नेमक्या किती लोकांच्या किडन्या काढण्यात आल्या याबाबतचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात हिमांशू व क्रिष्णाचा साथीदार असलेला तिसरा आरोपी अद्यापही पोलिसांना गवसला नसून त्याच्या शोधात पोलिसांचे पथक तळ ठोकून असल्याची माहिती आहे.

बँक व फोन-पे व्यवहार उघड; सावकारीचा तपासही 'एलसीबी'कडे

  • रोशन कुडे व सावकार यांच्यात बँक खात्यांद्वारे तसेच फोन-पेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
  • या व्यवहारांचा सखोल तपास करण्यात येत असून, रोख रकमेचे व्यवहार झाले आहेत का, याचीही पडताळणी सुरू आहे.
  • तसेच आरोपींनी या कथित व्यवसायातूनच मालमत्ता कमावली आहे का, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
  • विशेषतः आरोपींच्या नावावर असलेल्या कृषी जमिनींची कागदपत्रे, खरेदी-विक्री व्यवहार तसेच उत्पन्नाचे स्रोत यांची बारकाईने पडताळणी केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ब्रह्मपुरी पोलिसांकडून तपास काढून 'एलसीबी'कडे देण्यात आला आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Kidney racket: Doctors under scanner; accused in judicial custody

Web Summary : Two doctors are under LCB's radar for conducting medical tests before kidney transplants. Accused sent to judicial custody. Investigation reveals financial transactions. Police investigate land deals, assets, and income sources. The third accused is still absconding.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी